मुंबई / रत्नागिरी : Express trains Konkan railway line will run on electricity : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातील दोन गाड्या वीजेवर धावत होत्या. आता विजेवर धावणाऱ्या गाड्यांत भर पडणार आहे. कोकण रेल्वेवर 1 मे पासून 10 एक्स्प्रेस गाड्या विजेवर धावणार आहेत. या सर्व गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्त रेल्वेचा प्रवास होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत विद्युतीकरण असल्याने विजेवरील लोको मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जोडल्या जात होत्या. आता थेट गाड्या विजेवर धावणार आहेत. इंधन बचत, प्रदूषण टाळणे यासह मेल, एक्स्प्रेस गाडीला डिझेल लोको जोडण्याच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नुकतेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर  कोकण रेल्वेने पहिल्या टप्प्यात दहा गाडय़ा विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 


यामध्ये मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेसचा समावेश आहे. यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त तसेच वेगवान होईल. रोहा ते ठोकूर असा 700 किलोमीटरचा कोकण रेल्वेचा मार्ग आहे. याचे विद्युतीकरणाचे काम 2015 पासून हाती घेण्यात आले. विद्युतीकरणाचे काम सहा टप्प्यात पूर्ण करण्यात आले.


कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते थिविम या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. विजेचे इंजिन जोडून मंगळुरु सेंटर ते मडगाव पॅसेंजर विशेष, तिरुवंनतपुरम ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेससह मंगला एक्सप्रेस, मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्या चालवण्यात येणार आहेत.