कोल्हापूर / बारामती : राज्य सरकरने (Maharashtra govt) थकीत विजबिल (Electricity Bill ) ग्राहक शेतकऱ्यांची (farmers) वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आता जास्त आक्रमक झाल्याचे दिसून येते आहेत. दरम्यान, कोल्हापुरात सर्व पक्षाच्यावतीने वीजबिल  माफ करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही कायदे हातात घेवू, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Raju Shetti warns Maharashtra govt)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आता जास्त आक्रमक झाल्याचे दिसून येते आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या बारामती, इंदापूर तालुक्याच्या सीमारेषेवरील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर इथे छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केले आहे. 



स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांनी रस्ता रोखून धरला आहे. घोषणाबाजी करत शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे - बंगळुरु महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.


कोल्हापुरात सर्व पक्षाच्यावतीने विजबिल माफ करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही कायदे हातात घेवू, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. आम्ही सर्वच नेत्यांचे भेटलो आहेत. तरी देखील सरकार गप्प आहे हे आम्ही सहन करणार नाही अस देखील शेट्टी म्हणालेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.