Gateway  Of India To Elephanta Boat Ticket Price : एलिफंटा हे मुंबई जवळचे सर्वात लोकप्रिय प्रयटन स्थळ आहे. मुंबईच्या अरबी समुद्राजवळ एका बेटावर  एलिफंटा लेणी आहे. एलिफंटाला जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोट मिळते. जाणून घेऊया मुंबई ते एलिंफटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट किती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीचे तिकीट 260 रुपये इतके आहे. बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटाला जाण्यासाठी 60 मिनिटांचा म्हणजेच जवळपास एक तासांचा वेळ लागतो. दर 15 ते 30 मिनिटांनी गेट वे ऑफ इंडियाला जाण्यासाठी बोट मिळते. दर, सोमवारी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही बोट सेवा बंद असते. त्यामुळे सोमवारच्या दिवशी एलिफंटाला जाण्याचा प्लान अजिबात करु नका. 


गेट वे ऑफ इंडिया  येथून सकाळी 9 वाजता एलिफंटासाठी पहिली बोट सुटते. तर, गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी शेवटची बोट दुपारी 3.30 वाजता सुटते. यामुळे 3.30 नंतर तुम्ही गेट वे ऑफ इंडियाला पोहचला तर तुम्हाला एलिफंटाला जाता येणार नाही. यामुळे नियोजन करुनच एलिफंटाचा प्लान बनवा. 


एलिफंटाहून 12 वाजता गेट वे ऑफ इंडियाडे येणारी पहिली बोट निघते. तर, एलिफंटाहून गेट वे ऑफ इंडियाला येणारी शेवटची बोट ही सायंकाळी 6.30 वाजताची आहे. यानंतर एकही बोट येथे येत नाही. यामुळे ही शेवटची बोट सुटल्यास पर्यटकांना एलिफंटा बेटीवर अडकून पडावे लागू शकते. यामुळे एलिफंटाला फिरायला गेल्यावर वेळेचे भान ठेवाच.  


एलिफंटा लेणीत प्रवेशासाठी भारतीय पर्यटकांसाठी  40 रुपये प्रवेश शुल्क आहे. तर, परदेशी पर्यटकांकडून  600 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. 15 वर्षाखालील मुलांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आाकरले जात नाही. घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणीचे कोरण्यात आली आहे. 1997 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला.  एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.