पोलिसांचा दावा चुकीचा असल्याचा फरेराच्या वकिलांचा युक्तीवाद
`पोलीसांचा दावा चुकीच्या आणि अपुऱ्या माहीतीवर आधारीत`
पुणे : एल्गार परीषद प्रकरणी सध्या हाऊस अरेस्ट मध्ये असलेल्या अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पोलीसांनी जप्त केलेलं साहीत्य आणि पत्रं इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळं जप्त केलेलं साहित्य आणि पत्रं आक्षेपार्ह असल्याचा पोलीसांचा दावा चुकीचा आहे, असा युक्तिवाद फरेरा यांच्या वकीलांनी केला. तसेच, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर ही संघटना नक्षलवाद्यांची फ्रटं ऑर्गनायझेशन असल्याचा पोलीसांचा दावाही चुकीच्या आणि अपुऱ्या माहीतीवर आधारीत आहे, असं फरेरा यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितलं.
उद्या सुनावणी
वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा या तीघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती.
मात्र आज फक्त अरुण फरेरा याच्या जामीन अर्जावर त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला. भारद्वाज आणि गोनस्ल्वीस यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी सुनावणी होईल.