प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : अवघ्या चार तासांत पडलेल्या 80 मिलिमीटर पावसानं करवीरनगरीची पुरती त्रेधा उडवली. मध्यरात्री शहरात झालेल्या अतिवृष्टीनं सखल भागात पाणी भरलं. ओढ्या-नाल्याच्या कडेला रात्री पार्क केलेल्या मोटारी सकाळी गायब झाल्या होत्या. त्या गाड्या नाल्याच्या पाण्यात वाहुन गेल्याचं लक्षात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाल्यांमध्ये झालेलं अतिक्रमणामुळे या अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचं लक्षात आलं. नाल्याजवळच्या वॉकथ्रूमधला छोटा चंक वापरा. शहरातल्या जवाहर नगर, शास्रीनगर, रामानंदनगर, जरगनगर या भागात नाल्याचं पाणी घरात घुसल्यामुळं मोठं नुकसान झालंय. इतकंच नव्हे तर अनेकांना आपला जीव मुठित घेवुन या पाण्यातुन आपली सुटका करुन घ्यावी लागली. 


कोल्हापूर शहरात असलेल्या सर्व बारा नाल्यामध्ये बिल्डर आणि धनदांडग्यांनी अतिक्रमण केलंय. त्यामुळे नाल्यामध्ये बॉटलनेक तयार होऊन पाण्याचा झपाट्यानं निचरा होऊ शकत नाही. त्यामुळे अवघ्या चार तासांच्या पावसात शहराचा सखल भाग पाण्याखाली गेल्याचं पहियला मिळालं. नाल्यांमधली अतिक्रमणं हटवण्याच्या वल्गना महापालिका नित्यनेमानं करत असते. पण असं घडलेलं नाही, हे स्पष्टच आहे..