नागपूर : राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे. मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना आता ग्रामीण भागात पसरत आहे. त्याचवेळी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडत आहे. नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राऊत यांनी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाई व्हावे तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील ३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला. ३३ टक्के डॉक्टर मुंबईतील आहेत. आयएमए’च्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक म्हणजे १२ डॉक्टरांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. या खालोखाल ठाणे, भिवंडी, कल्याण या भागांत आठ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद आहे.


नागपुरात कोरोनाचा धोका वाढला


नागपूराच कोरोनाचा कहर सुरुच आहे. नागपुरात काल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आतपपर्यंत एकादविशी मृत्यूचा उच्चांकी आकडा आहे. तर काल १७१७ कोरोना रुगणांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८,८९० झाली असून आतापर्यंत १८७९ जणांचे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असल्याने नागपुरात चिंताजनक परिस्थिती आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या संख्या४५,३७२ झाली आहे.