मुंबईच्या दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान `भरतक्षेत्र`वर ईडीची धाड
Mumbai News Today: दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र दुकानावर बुधवारी सक्तवसुली संचालनालय (ED) ने धाड टाकल्याची माहिती समोर येते आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai News: दादर (Dadar) येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र (Bharatkshetra) दुकानावर बुधवारी सक्तवसुली संचालनालय (ED) ने धाड टाकल्याची माहिती समोर येतेय. गेल्या चार तासांपासून ईडीचे अधिकारी दुकानात असून कारवाई सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अफराताफर केल्याप्रकरणी ही धाड टाकल्याचे समोर येते. (Ed Raid On Bharatkshetra)
दादरमधील भरतक्षेत्र हे दुकान खूप प्रसिद्ध आहे. या दुकानावर धाड पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने भरतक्षेत्र साडी व्यापाऱ्यावर कारवाई केल्याचे समोर येतेय. सकाळीच ईडीचे अधिकारी या दुकानात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दस्तावेज व कागदपत्र ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य सरकारमधून काही राजकीय नेत्याशी कनेक्शन असल्याची माहिती समोर आली होती. तसंच, हवाल्याच्या मार्फत काही इथून मोठ्याप्रमाणात रक्कम गेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतरच ईडीने ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. त्या संदर्भातच ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. चार तासानंतरही ईडीचे अधिकारी अद्याप भरतक्षेत्र दुकानात उपस्थित आहेत.
दादरमधील भरतक्षेत्र दुकान हे साड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण मुंबईतून या दुकानातून खरेदीसाठी ग्राहक येतात. आता लग्नसराईचे दिवस असताना दुकानात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशातच दुकानात धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.