Crime News : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने एका मयत व्यक्तीची 19 कोटींहून अधिक संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण उघडकीस आलं असून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलसांनी महिलेसह ख्रिश्चन धर्मगुरू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. (Maharashta Thane District Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण?
संबधित महिला ही आधी अंजली अग्रवाल हिचे मृत व्यक्तिसोबत संबंध होते. मात्र गेल्या वर्षी त्याचा नोव्हेंबरमध्ये एचआयव्हीमुळे मृत्यू झाला होता. या मृत व्यक्तीची एकूण 19 कोटींपेक्षा जास्त रूपयांची संपत्ती होती आणि तो अविवाहित होता  त्यानंतर अंजली अग्रवालने ही संपत्ती आपल्या नावे करण्यासाठी एक डाव आखला.


अंजली अग्रवालने मृत व्यक्तीची पत्नी असल्याचं दाखवण्यासाठी एक बनावट विवाह प्रमाणपत्र केलं. हे बनावट प्रमाणपत्र बनवण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्मगुरू थोमासर गोडपावर आणि त्याचा मित्र महेश काटकर याची मदत घेतली. या खोट्या विवाह पत्राच्या आधारे एक फ्लॅट आपल्या नावावर केला होता. 


मयत व्यक्तीच्या आईला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि संपत्तीची फसवणूक झाल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.