COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कारला भीषण अपघात झालाय. पाचपुते यांच्या गाडीला शिरुरजवळ भीषण अपघात झालाय. शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शिरुरजवळील कानीफनाथ फाटा परीसरातील हॉटेल सदगुरू वडेवाले इथं हा भीषण अपघात झाला. पाचपुते यांची कार एका ट्रकला धडकली. यात कारच्या समोरील बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचुर झालाय. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झाली नाही.


पाचपुतेंची विचारपुस


बातमी कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर अनेकांनी मोबाईलवरुन पाचपुतेंची विचारपुस करत धीर दिला.