जळगाव : माजी मंत्री सुरेश जैन यांनी काहीवेळा पूर्वी मतदानाचा हक्क बजावला. सहकुटुंब मतदानासाठी ते हजर होते. सध्या जळगाव महापालिकेत सुरेशदादा यांचीच सत्ता आहे. गेल्या निवडणुकीवेळी सुरेश जैन पालिका घरकूल घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात होते. यावेळी मात्र ते प्रत्यक्षात मैदानात असल्यानं भाजपसमोरं कडवं आव्हान आहे. यावेळी विजय आपल्याच होईल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज मतदान होत आहे. शहरातल्या ४६९ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे. यासाठी २ हजार ७८० मतदान कर्मचारी कार्यरत आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पालिका प्रशासनाने यावेळी विशेष प्रयत्न केले आहेत. 



जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसंच माजी मंत्री सुरेश जैन यांच्या दृष्टीने ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे.