KCR in Maharashtra :  बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao) यांच्यासह अख्ख्या मंत्रिमंडळ महाराष्ट्रात तळ ठोकून आहे. चंद्रशेखर राव  यांच्या एंन्ट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनानिमित्ताने आलेल्या चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात मोठं शक्तिप्रदर्शन केले आहे. राष्ट्रवादीनंतर महाराष्ट्रातील आणखी एक  मोठा पक्ष चंद्रशेखर राव यांच्या टार्गेटवर आहे. बीआरएस महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची मोठी घोषणा देखील चंद्रशेखर राव यांनी केली आहे. चंद्रशेखर राव यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापणार आहे. 


बीआरएस महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार; चंद्रशेखर राव यांची घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत परिवर्तन हेच आमचे काम. आमचा एकच उद्देश तो म्हणजे देश परिवर्तन. तुम्ही काँग्रेसला, भाजपाला संधी दिली आता आम्हाला द्या. आम्ही बदल घडवू असं म्हणत चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. 


भाजप नगरसेवकाला BRS पक्षात येण्याची ऑफर


तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR राव यांची भाजप नगरसेवक नागेश वल्याळ यांना BRS पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. भाजप नगरसेवक नागेश वल्याळ हे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील पाहिले खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आहेत. राव यांनी भाजपचे दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वल्याळ यांचे पुत्र, भाजप नगरसेवक नागेश वल्याळ हे बीआरएस मध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.  के सी आर राव यांनी घरी आल्यानंतर मला बीआरएस पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे वल्याळ म्हणाले. 


भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांची मुलगी बीआरएसमध्ये जाणार?


माजी मंत्री आणि भाजपचे सोलापुरातले ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांची मुलगी बीआरएसमध्ये जाणार का याची चर्चा सुरु झाली आहे. लक्ष्मण ढोबळे यांची कन्या आणि बहुजन रयत संघटनेच्या कोमल ढोबळेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं कोमल ढोबळेंनी म्हटलंय. मात्र तरीही भगीरथ भालकेंनंतर कोमल ढोबळेही बीआरएसमध्ये जाणार का याची चर्चा रंगली आहे.


महाराष्ट्रात बीआरएसचं सरकार येऊ दे - चंद्रशेखर राव यांचे तुळजाभवानीला साकडं  


तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव 26 जून रोजीच महाराष्ट्रात दाखल झाले. चंद्रशेखर राव यांनी सकाळी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. यानंतर  चंद्रशेखर राव 25 मंत्र्यांना घेवून तुळजाभवानीच्या दर्शनाला गेले. चंद्रशेखर राव यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतलं. महाराष्ट्रात बीआरएसचं सरकार येऊ दे असं साकडं त्यांनी यावेळी घातलं. केसीआर यांचं तुळजापुरात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. देवीचं दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराची पाहणी केली.