सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: गाईच्या दुधाने कोरोना (corona) बरा होतो का यावर सध्या संशोधन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आत्ताच याची खात्री काय हे सांगणं योग्य ठरणार नाही कारण अद्यापही या संदर्भात संशोधन चालू आहे. त्याचे प्रयोगही प्राण्यांवर करण्यात आले आहेत. काही प्रमाणात निसर्गातील घटक कोरोना बरं करू शकतात. प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच हे समजू शकेल की गायीच्याही दुधानं करोना बरा होतो की नाही ते. (Fact check can corona gets cured after having cow milk what is the truth)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा दावा आहे की, गायीचं दूध प्यायल्याने कोरोना रोखण्यास मदत होते. गायीचं (cow milk) दूध पिणा-याला कोरोना होणार नाही, हा दावा केल्यानं अनेकांना प्रश्न पडले असून खरंच गायीच्या दुधात कोरोना रोखण्याचे प्रोटीन्स आहेत का? असा प्रश्नही पडतो आहे. हे अनेक दावे केल्यामुळे लोकांना याचं सत्य जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं याचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पण, मेसेजमध्ये काय दावा केला आहे ते आता पाहूयात. 


व्हायरल मेसेज काय? 


कोरोना रोखण्यासाठी अजून कोणतं औषध आलेलं नाही. फक्त लस कोरोनाविरोधात लढण्यासाठी वापरली जातेय. पण, गायीचं दूध प्यायल्याने कोरोना रोखण्यास मदत होते हा निष्कर्ष प्रयोगशाळेत काढण्यात आलाय. हा मेसेज व्हायरल झाल्याने आमचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले. त्यांना मेसेज दाखवला मग त्यांनी या मेसेजबद्दल काय म्हटलंय पाहुयात.


तज्ञ काय म्हणतात? 


गायीच्या दुधात लॅक्टोफिरन नावाचे प्रथिनं असते. त्यामुळे विषाणूंना रोखण्यास मदत होते. हा प्रयोग आत्तापर्यंते प्रयोगशाळेत झाला आहे, अशी माहिती  डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली. 


त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहा - 


1. गायीच्या दुधात लॅक्टोफिरन नावाचे प्रथिन आढळते. 
2. काही विषाणूंना रोखण्यापासून लॅक्टोफिरनमुळे मदत होते. 
3. कोरोना विषाणूही लॅक्टोफिरनमुळे रोखला जाऊ शकतो. 
4. हा निष्कर्ष प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात समोर आला आहे. 
5. यावर अजून माणसांवर प्रयोग झालेला नाही. 


हे फक्त प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे पण किती प्रमाणात गायीचं दूध प्यायल्याने विषाणू रोखण्यास मदत होते? हा प्रयोग अजून माणसांवर झालेला नाही त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे हे सध्या तरी सांगता येणं कठीण आहे.