Bogus crop insurance: बनावट शेतकरी बनून एन प्लॉटवर, शेती महामंडळाच्या जागेवर शेती करत असल्याचे भासवून आणि काही सीएसएस सेंटर धारकांना हाताशी धरत 1 रुपया पीकविमा भरत कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर तालुक्यातील 500 हेक्टर जमीन, 107 शेतकरी, काही CSC सेंटर चालक आणि काही सर्वे करणारे कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरीप हंगाम 2024 या वर्षात मालेगाव तालुक्यातील 17,333 शेतकर्यांनी एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेचा फॉर्म भरला. यात कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे शासनाच्या अस लक्षात आल की काही शेतकऱ्यांनी कांदा पीक नसतांना पीकविमा काढला. त्यामुळे कृषी विभागामार्फत एक पथक नेमण्यात येवून याची पाहणी केली असता तालुक्यात आत्ता पर्यंत 107 शेतकरी यात दोषी आढळले तर जवळपास 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीकविमा काढल्याच निष्पन्न झालं.


या चौकशीत आणखी धक्कादायक बाब अशी समोर आली की या 107 शेतकऱ्यांपैकी 71 हे बनावट शेतकरी निघाले असून त्यांनी 422 हेक्टर वर पीक नसतांना ही पीक विमा काढला. या प्रकरणात काही CST सेंटर धारकांना हाताशी धरत NA प्लॉट, शेतकी महामंडळाच्या ज्या जमिनी तसेच वेगवेगळ्या NA गट नंबरवर पीकविमा काढल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली.त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. कृषी विभाग आणि पीकविमा कंपनी अधिकारी व कर्मचारी या पथकाने तालुक्याच्या ठिकठिकाणी जावून पाहणी केली. दोषी असलेल्या 107 शेतकऱ्यांची नावे पोर्टल वरून कमी करण्याचे काम कंपनी तर्फे सुरू करण्यात आले.आणि त्यांचाही अहवाल त्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठवला.


जळगावमध्ये गेल्या 10 महिन्यात 137 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन


केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात नैराश्यातून 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविलीये. शासकीय आकडेवरीतून हे कटू वास्तव समोर आलये. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी नापिकी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा मनोधैर्य पूर्त खचल्याचा दिसून येत आहे, खानदेशातील प्रमुख जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने कपाशीचं पीक घेतले जाते. कपाशी विक्रीसाठी बंधन असल्याने ही कपाशी सरकारलाच विकावी लागते सरकारने ठरवून दिलेल्या दरात केंद्रांवर त्यांच्या नियमाप्रमाणे ही कपाशी विकायला शेतकरी आणतो मात्र तिथल्या जाचक नियम आणि तरतुदीनुसार त्याला भाव कमी मिळतो त्यामुळे निराश झालेला शेतकरी अखेर मिळेल त्या भावात आपलं कपाशी पीक देऊन मोकळा होतो.सध्या जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर लागवडीखाली सध्या रब्बी हंगामात हरबरा, गहू, ज्वारीसह सूर्यफूलाचीही लागवड केली जाते. याबरोबर कपाशी, ज्वारी, बाजरी या जिरायती वाणांसह केळीचे प्रामुख्याने पीक घेतलं जातं. मागील काही काळापासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, तर अनेकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागतोय . त्यात कहर म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून कापूस व सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे बजेट पूर्णतः कोलमडतये. यामुळेच कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून दर महिन्याला सरासरी 12 शेतकरी आत्महत्या करतायेत. जिल्हा प्रशासनाकडे मदत प्रस्तावासाठी आलेल्या निकषानुसार आतापर्यंत गेल्या दहा महिन्यात 136 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा समोर आले. सर्वाधिक आत्महत्या फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात झाल्या आहेत.