सागर आव्हाड / पुणे : Pune land scam : बातमी 'झी 24 तास'च्या इम्पॅक्टची. बोगस गुंठेवारी दस्तनोंदणीचं (fake Gunthewari docus) रॅकेट पुण्यात उघड झाले आहे. 'झी 24 तास'ने सर्वप्रथम या गुंठेवारी दस्तनोंदणी रॅकेटला वाचा फोडली होती. त्यानंतर चौकशी झाली आणि त्यात अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल 10 हजार बोगस दस्त नोंदणी झाल्याचं उघड झाले आहे. (Bogus Gunthewari docus registration)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दस्तनोंदणीद्वारे कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. (fake Gunthewari docus) राज्यातल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील 44 अधिकाऱ्यांवर नोंदणी महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबन आणि विभागीय चौकशीची कारवाई केली. 


सरकारने बंदी घातल्यानंतर आणि गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. तरीही एकट्या पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 44 दुय्यम निबंधक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने 10 हजार 561 बोगस गुंठेवारीच्या दस्त्यांची नोंदणी केली आहे. 400 हून अधिक गुंठेवारीचे दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकांना त्वरीत निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आलेत. 



दरम्यान, त्याआधी आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. (Fake NA order in Pune)  फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासूनच रजिस्ट्रेशन केले जाते. मात्र पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलाल आणि सरकारी बाबूंनी केलेल्या या बोगस दस्त नोंदणीचा भांडाफोड  'झी 24 तास'ने केला आहे.