प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : आपल्यापैकी अनेकांना उरलेलं अन्न फ्रिजमधून ठेवून खाण्याची सवय असते. पण तुमची ही सवय जीवावर बेतू शकते. लाखांदूर तालुक्यात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना विषबाधा झाली आहे. याच कारण आहे फ्रीजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना सरांडी बु येथे घडली.ताराबाई कुंभरे (65), शालिनी कुंभरे (40), गोवर्धन कुंभरे (51), सुजिता कुंभरे (14), दुर्गा कुंभरे (11) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु येथील ताराबाई कुंभरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी उडदाच्या डाळीच्या वड्यांची भाजी बनविली होती.कार्यक्रमानंतर घरातील सर्वांनी जेवण करून उरलेली भाजी घरातील फ्रिजमध्ये ठेवली होती. सकाळी फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी गरम करून खाल्ल्याने पाच जणांची प्रकृती बिघडली. ही घटना उघडकीस येताच त्यांना सरांडी बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.


महत्त्वाचं म्हणजे कुंभरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी देखील ही भाजी खाल्ली पण त्यांना कोणतीही विषबाधा झाली नाही. यामुळे उरलेली भाजी फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काही चुकीचा प्रकार घडला का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र प्राथमिक माहितीत फक्त एवढीच घटना समोर आली आहे. 


कोणते पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत


मसाले - जर मसाले फ्रीजमध्ये ठेवले तर ते ओलसर होऊ शकतात. ज्यामुळे मसाले गोठू शकतात आणि यामुळे मसाले खराब होऊ शकतात.


ब्रेड - फ्रिजमध्ये ठेवल्यास ब्रेड लवकर खराब होऊ शकतो. यामुळे, ब्रेड लवकर सुकते आणि कडक होऊ शकते.


सुका मेवा - सुका मेवा देखील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. रेफ्रिजरेटरची थंडी आणि आर्द्रता सुक्या मेव्याची चव खराब करू शकते आणि त्यामुळे सुका मेवा लवकर खराब होऊ लागतो.


मसाले आणि औषधी वनस्पती - रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास तापमान आणि आर्द्रतेमध्ये वारंवार बदल झाल्यामुळे मसाले आणि औषधी वनस्पतींचा सुगंध आणि चव खराब होऊ शकते.


केशर - पोषणतज्ञांच्या मते, केशर फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात आर्द्रता वाढू शकते आणि केशरमध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात आणि त्याची प्रभावीता देखील कमी होऊ शकते.


कॉफी - जर कॉफी फ्रीजमध्ये ठेवली तर कॉफीच्या डब्यातील आर्द्रतेमुळे कॉफी गोठू लागते आणि त्यामुळे कॉफीच्या चवीवरही परिणाम होतो.


फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यामुळे काय होते नुकसान?


रेफ्रिजरेटरमध्ये गरम अन्न ठेवल्यास त्याचा ताजेपणा आणि चव यावर परिणाम होतो. उष्णतेमुळे, इतर खाद्यपदार्थांवर बर्फाचे स्फटिक तयार होऊ लागतात, ज्यामुळे त्यांची चव आणि पोत खराब होऊ शकतात.


बॅक्टेरिया आणि बुरशी


गरम अन्न सामान्य तापमानात  थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने अन्नाचे तापमान अचानक कमी होते, ज्यामुळे आतमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका वाढतो.