मुंबई : मराठी साहित्यातील वेगळ्या धाठणीचे लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह. मो. मराठे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. म्हणून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी रात्री १.४६च्या दरम्यान उपचार सुरू असताना त्यांनी रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सकाळी ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.


१९४०मध्ये जन्मलेले मराठे तरूण वयापासूनच लोकप्रिय लेखक ठरले. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्यांचे लिखाण केले. ह. मो. लेखक म्हणून तर प्रसिद्ध होतेच. पण, त्यांनी पत्रारितेमध्येही विशेष कामगिरी केली. किर्लोस्कर मासिकाचे संपादक मंडळ ते लोकप्रभा, पुढारी, घरदार, मार्मिक, नवशक्ती आदी नियतकालिकांसाठीही त्यांनी लिखाण केलं.