प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्याजाचे पैसे उकळणाऱ्या सावकारांनी एका शेतकऱ्याचं अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्याला सावकारांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. किरवे गावातील शेतकरी रणजित पाटील यांनी सावकारांकडून १० लाख रुपयाचं कर्ज घेतल होतं. या कर्जापोटी रणजीत पाटील यांनी पतसंस्थेचं कर्ज घेवून ५ लाख रुपये फेडले होते. मात्र पाच लाख फेडल्यानंतरही सावकारांनी २५ लाखाच्या वसुलीसाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला होता. 


मार्च २०१९ मध्ये आर्थिक अडचणीमुळे रणजीत पाटील यांना व्याजासह हप्ता द्यायला विलंब झाला. त्यामुळं संतापलेल्या सावकारांनी पाटील यांना कोल्हापूरातील देवकर पाणंद इथल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं आणि रणजित पाटील यांना बेदम मारहाण केली. 


याप्रकरणी पोलिसांनी सूरज साखरे आणि ऋषभ भालकर या दोघांना सावकारांना अटक केली. कोल्हापूर जिल्ह्यात सावकारांकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तींची पिळवणूक वाढतच चालली आहे. त्यामुळं कर्ज घेतलेल्या व्यक्तींनी धाडस करुन तक्रार करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>