हेमंत चापुडे, झी २४ तास, खेड, पुणे : शेतकरी धन्याला बरकत यावी म्हणून त्याच्याबरोबर शेतात बैल राबतो. परंतु सध्या बरेच शेतकरी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर करतात. पण खेड तालुक्यातल्या वडगाव पाटोळेमधल्या शंकर पाटोळें मात्र बैलावरच जास्त विश्वास होता. 28 वर्षापूर्वी शंकर पाटोळेंकडच्या एका गायीला खिलार जातीचा गोरा झाला. शंकर यांनी त्याचं नाव शेलार ठेवलं. शेलार पाटोळे कुटुंबीयांच्या घरचाच सदस्य झाला होता. पण पंधरा दिवसांपूर्वी शेलारचं निधन झालं. त्यानंतर पाटोळे कुटुंबीयांनी लाडक्या शेलारचे दशक्रिया विधीही केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर शेलारनं मालकाला चांगली साथ दिली होती. मशागत, नांगरणी, पेरणी जिथे त्याला जुंपलं  तिथं त्याने सोन्यासारखं पीक उगवलं. त्यामुळे शंकर यांचं शेलारवर खूप प्रेम होतं.


त्यामुळे मग या बैलाची आठवण म्हणून आणि  प्रेम म्हणून, शंकर यांनी शेलारची आपल्या अंगणातल्या तुळशीशेजारीच त्याचा पुतळा उभारला.


शेलार आता या पुतळ्याच्या रुपानं कायम त्यांच्या आठवणींत राहणार आहे. हा पुतळा बळीराजा आणि बैल यांच्या जिवाभावाच्या साथीचं एक उत्तम उदाहरण आहे.