कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर
धुळे आणि नंदुरबार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी दिवस नागतंय, कापसाला हमीभावापेक्षा हजार रुपये कमीच दर शेतकऱ्यांना दिला जात आहे.
धुळे : धुळे आणि नंदुरबार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी दिवस नागतंय, कापसाला हमीभावापेक्षा हजार रुपये कमीच दर शेतकऱ्यांना दिला जात आहे.
जागतिक बाजारपेठेत कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांचा कापूस बोनडाळीग्रस्त आहे असे बहाणे करून शेतकऱ्यांकडून कापूस कवडीमोल भावात खरेदी केला जात आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कापसाला सरासरी साडेतीन ते चार हजारपर्यंत दर मिळत आहे. सरकारी खरेदी केंद्र नावालाच असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला कापूस विकावा लागत आहे.