भाजप आमदारांच्या उपस्थित शेतकऱ्यांचा रास्ता रोको
जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीकरिता नागपूर-अमरावती मार्गावर गारपिटग्रस्त शेतक-यांनी रस्तारोको केला आहे. भाजप आमदार आशिष देशमुखही या आंदोलनात सहभाही झाले होते.
नागपूर : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीकरिता नागपूर-अमरावती मार्गावर गारपिटग्रस्त शेतक-यांनी रस्तारोको केला आहे. भाजप आमदार आशिष देशमुखही या आंदोलनात सहभाही झाले होते.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
काटोल, नरखेड तालुक्या सोमवारी सायंकाळनंतर झालेल्या गारपीटने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भऱपाईच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शेतक-यांनी नागपूर-अमरावती मार्गावर रस्तारोको केला.
'मुख्यमंत्र्यांनी पाहाणी करावी'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसान भरपाईची पाहणी करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले आमदार आशिष देशमुखही शेतक-यांसोबत आंदोलनात सहभागी होते.
उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या
यासाठी उद्या काटोल येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती आशिष देशमुख यांनी दिली. काटोल नरखेड तालुक्यातील नुकसानीची पाहणी आशिष देशमुख यांनी केली.