नाशिक : जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान याच बैठकीनंतर कृषी उत्पन्न बाजारसमितीत भाजपनेही सक्रियपणे उडी घेतली. भाजप शहराध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब सानप, वसंत गीते आमदार खासदार सरकारची भूमिका समजावून सांगत आहेत. त्यामुळे आता यात राजकीय श्रेय घेण्याच्या चढाओढीत आंदोलनच भवितव्य अवलंबून आहे.