पुणे, नवी मुंबई : पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. तर वाशी  एपीएमसी मार्केटमध्ये आजही भाजीपाल्याची  आवक सामन्यपणे सुरू आहे. आज सकाळपासून  वाशीत 320 गाड्यांची आवक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 45 कांद्याच्या गाड्या आणि बटाट्याच्या 44  गाड्या दाखल झाल्यात आहेत.  त्यामुळे आता परिस्थिती काहीप्रमाणात सुधारताना दिसतेय.. पण यापैकी बहुतांश गाड्या परराज्यातल्या असल्यानं राज्यातला माल अजूनही मुंबईत आलेला दिसत नाही. शेतकरी संपामुळे भाज्यांचे भाव मात्र वाढलेलच आहेत. 
 
पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. पुणे मार्केट यार्डात दररोज साधारण 1200 ते 1300 गाड्यांची आवक होते. आज पन्नास टक्के आवक झाली आहे. मात्र मागील चार - पाच दिवसांच्या तुलनेत ही आवक जास्त आहे. मागील चार दिवस 20 ते 30 टक्केच आवक होत होती..


शेतकरी संघटना आक्रमक,  टाळे ठोकण्याचा इशारा


महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्यानंतर आज शेतकरी संघटनांनी सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा दिलाय. पुणतांब्यासह जिल्हाभरात टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.  


परवा रात्रीपासून शेतक-यांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दुध भाजीपाल्याच्या गाड्या अडवून माल रस्त्यावर फेकण्यात आला होता. आज मात्र तशी परीस्थिती दिसत नाही  काही ठिकाणी  दुध संकलनास सुरुवात झाली. भाजीपाल्याची आवक ही होतेय. 


राहुरी, श्रीरामपुर,संगमनेरया मोठ्या बाजार समित्या आजही बंदच ठेवण्यात आल्या आहेत.  आता, संगमनेर येथील राजहंस सहकारी दुध संघाचं दुध संकलन आजही बंद ठेवण्यात आलं आहे. राहुरी बाजार समीतीच गेट बंद करत प्राजक्त तनपुरे आणि शेतकर्यांनी रात्री जागरण गोधळ आंदोलन केल होत आज राहुरीतीलही अनेक दुध संकलन केंद्र बंदच आहेत 


बेमुदत उपोषण सुरू 


शिर्डीतल्या शेतकऱ्यांनी राहुरी बाजार समिती समोर काल सकाळपासून  बेमुदत उपोषण सुरू केलंय. सरकारला जाग यावी म्हणून काल रात्रभर जागरण गोंधळ करण्यात आला.  दरम्यान रविवारी रात्री राहुरी शनि शिंगणापूर रस्त्यावर एक दुधाचा टँकर अडवून पेटवण्यात आला होता. 


या प्रकरणी राहुरी पोलिसांनी ९ शेतक-यांवर 307 चा गुन्हा दाखल केलाय. यात काही वृध्द शेतकरी आहेत तर काही शेतकरी त्या वेळी पुणतांब्यात होते त्यामुळे शेतक-यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलाय.