भंडारा :  गेल्या पंधरा दिवसापासून धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा मार्गावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच धान उत्पादक शेतकरी चिन्तातूर असून चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे .


तुमसर तालुका अंतर्गत येत असलेल्या सालई या गावातील माणिक पटले असं या ४५ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे.  उत्पन्न नाही, मुलीच्या लग्नाची चिंता त्यामुळे अखेर निराश होतं कीटकनाशक प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.