शेतकऱ्याला किटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
एका ६० वर्षीय शेतकऱ्याला किटकनाशक औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दत्तू बनकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बदलापूर : एका ६० वर्षीय शेतकऱ्याला किटकनाशक औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दत्तू बनकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शेतावर गेले असता त्यांना जबरदस्तीने किटकनाशक पाजण्यात आले. घरी आल्यवर त्यांनी सगळा प्रकार सांगिला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
जमिनिच्या वादातून हा हल्ला केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. जमिनीच्या एका प्रकरणात नुकतीच अंबरनाथ तहसीलदारांसमोर सुनावणी झाली होती. त्यात बनकर यांच्या बाजूने निकाल लागला होता. त्यामुळे हा सगळा प्रकार समोरच्या पक्षाने केल्याचा आरोप बनकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांचा जवाब नोंदवला नसल्याचं पोलिसांनी सांगितले.