COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : देशभरात शेतकरी संपंचा भडका उडालाय.. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात फारशी झळ बसली नाही. मात्र, शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं सरकारला ५ जूनचा अल्टिमेटम देण्यात आलाय. सरकारविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिलाय.


सरकारकडून या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही तर सात जून रोजी शहराकडे जाणारे दूध आणि शेतीमाल थांबवण्यात येईल. यानंतरही सरकारला जाग आली नाही तर १० जूनला देशभरातील शेतकरी चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिलाय. मात्र, दुसरीकडे प्रस्थापीत नेत्यांनी या संपाविरोधात सूर लावल्यानं संपात फूट पडल्याचं चित्र आहे.