गणेश मोहळे, वाशिम - जुनच्या पहिल्या आठवड्यात कृषीराजा पावसाच्या आगमान कधी होणार यांची उत्सुकतेने वाट पाहत असतो. याच हंगामात ग्रामीण भागात चातक पक्षाची सुद्धा तितक्याच आतुरतेने बळीराजा वाट पाहत असतो. चातक पक्षी हा पावसाचा संकेत देणारा पक्षी आहे. मात्र यंदा मृग नक्षत्र नजीक आले तरी चातक पक्षाची चाहूल लागत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. प्राचीन काळापासून मृग नक्षत्रात चातक पक्षी शेतकऱ्यांना चांगल्या समाधानकारक पावसाची चाहूल देत असतो. हवामान खात्याने यंदा पाऊस समाधानकार पडणार असल्याचे सांगितले आहे. काही जिल्ह्यात मान्सूनपुर्व सरी कोसळण्यास सुरुवात देखील झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चातक पक्षी हा संपुर्ण वर्षभर मान्सूनची वाट पाहत असतो. ऐरवी वर्षभर या पक्ष्याचा आवाज किंचितच कानावर येतो. पण पावसळ्यात चातकाचा आवाज हमखास येतोच. मराठी साहित्यात चातकाचा उल्लेख आपल्याला पाह्याला मिळतो. चातकला इंग्रजीत Jacobin cuckoo असे उच्चारले जाते. 


चातकाची वैशिष्टये 
चातकाच्या डोक्यावर शिखरासारखी रचना असते.  चातक 'कोकीळ' समुहातील पक्षी असून तो इतर पक्ष्यांपेक्षा बराच वेगळा आहे. चातक १५ इंच लांबीचा काळा पक्षी आहे. पावसाळ्यात हा पक्षी आपल्या मधुर आवाजाने हाक देताना पाह्यला मिळतो. हा पक्षी सर्व उष्ण देशांमध्ये आढळून येतो. या पक्ष्यांची पहिली आणि चौथी बोटे मागे दुमडलेली असतात. 


यावर्षी चातकाचा स्वर शेत शिवारात दुमदुमत नसल्याने याची शेतकऱ्यांना सुद्धा काळजी लागलेली आहे त्यामुळेच की काय?राज्यात कृषी केंद्रावर दरवर्षी सारखी घाई गर्दी दिसून येत नाही असा सवाल ग्रामीण भागात पडला आहे.