नवे कृषी विधेयक कायदे शेतकरी विरोधी- यशोमती ठाकूर
नव्या कृषी धोरणा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी धोरणा विरोधात काँग्रेसच्या वतीने आज दिल्ली येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने निदर्शने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीत इरविन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या कृषी धोरणा विरोधात आंदोलन सुरू आहे.
मोदी सरकारने कृषि केलेले कायदे हे शेतकरी विरोधी असून मोदी सरकारची लोकांवर दडपशाही सुरू असल्याची टीका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. कृषी कायदा शेतकऱ्यांना फायदा होणार नसून ते शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे असेही त्या म्हणाल्या. अमरावतीच्या नवीन चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन काँग्रेसच्या वतीने सुरू आहे.
यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की मोदी सरकारने आणलेले कायदे चुकीचे आहेत. ती शेतकऱ्यांवर एक प्रकारची दळभद्री आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही असा आरोप केलाय.
शेतकरी पैसे कोणाकडे मागेल असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे मोदी सरकारने अमलात आणलेले हे कायदे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली.