COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जळगावात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळं उकाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकाना मोठा दिलासा मिळाला. सायंकाळी आकाशात अचानक ढग दाटून आले. काही क्षणातच सोसाट्याचा वारा सुटल्यानं ढगांचा गडगडाट तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात देखील काही भागात या पावसानं हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून मृग नक्षत्रात देखील वरून राजाची कृपादृष्टी राहिली तर लवकरच जिल्ह्यात पेरण्यांना सुरवात होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसतोय.


राज्यात येत्या एक दोन दिवसांत मान्सूनचं आगमन अपेक्षित असतानाच आज जळगावात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली यामुळं उकाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकाना मोठा दिलासा मिळाला. सायंकाळी आकाशात अचानक ढग दाटून आले. काही क्षणातच सोसाट्याचा वारा सुटल्यानं ढगांचा गडगडाट तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या बरसल्या. यामुळं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात देखील काही भागात या पावसानं हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून मृग नक्षत्रात देखील वरून राजाची कृपादृष्टी राहिली तर लवकरच जिल्ह्यात पेरण्यांना सुरवात होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसतोय.