मुंबई : संपूर्ण कर्जमाफी, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभरात मोर्चे काढले. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी २६ टक्के शेतकरी मराठा समाजातील असल्याची धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे. त्यामूळे मराठा समाजाचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर आला आहे. पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स यांनी केलेल्या रिसर्च स्टडीमधून ही माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एप्रिल २०१४ ते मार्च २०१६ दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात एकूण ३८८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विशेष म्हणजे आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.  २६ टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते. एकट्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात ५३ टक्के मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी फक्त पाच टक्के शेतकऱ्यांकडे कोणतीच जमीन नव्हती असं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. 


आत्महत्यांमध्ये कोणता समाज कुठे ?


शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रश्नी दोन जिल्ह्यांमध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यामध्ये  मराठा समाज शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वात पुढे असल्याचे दुर्देवी सत्य समोर आले आहे.


यानंतर  कुणबी (१६ टक्के), दलित (१० टक्के) आणि बंजारा (९ टक्के) समाजातील शेतकरी असल्याची माहिती सरकारी अधिका-याने दिली आहे. 


कसे झाले सर्व्हेक्षण ?


पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण १३ जिल्ह्यांमध्ये जाऊन माहिती गोळा केली. आत्महत्याग्रस्त तीन हजार शेतकरी कुटुंबांना भेट त्यांनी दिली. त्यांना विविध प्रश्न विचारु माहिती गोळा करण्यात करत त्याचा अहवाल बनविण्यात आला.