मुंबई : शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत.  आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ५२५ गाड्यांची आवक झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर नवी मुंबईत महाराष्ट्रातूनच ५० टक्के गाड्या आल्यायत.  संगमनेर, कात्रज, सांगलीमधून भाजीपाला आणि फळं एपीएमसीमध्ये दाखल झालीयत. भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे भावही उतरायला लागलेत. 


शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. नाशिकमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार कालच्या पेक्षा आवक वाढलीय. मात्र अजून लिलावांना सुरुवात झालेली नाही. शेतक-यांपेक्षा संख्येपेक्षा छोट्या विक्रेत्यांची संख्या जास्त आहे..पण हळूहळू पूर्वपदावर येतंय. त्यामुळे शहरात भाजीपाल्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे.


पुण्यात मार्केट यार्डाची परिस्थिती आज पूर्वपदावर आलंय. १ हजार ८३ गाड्यांची आवक झालीय. दररोज साधारण १२०० ते १३०० गाड्याची आवक होते.  कोल्हापूर मध्ये परिस्थिती काल पूर्वपदावर आली होती. त्यामुळे आता बहुतांश महाराष्ट्रात भाज्याचे भावही पूर्वपदावर येऊ लागले आहेत. 


सुमारे आठवडाभराच्या शेतकरी संपानंतर, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा भाज्यांची आवक वाढली आहे. संपामुळे कल्याणच्या बाजार समितीमधली भाज्यांची आवक रोडावली होती. आता भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं भाजीपाला आणि अन्नधान्याचे भाव उतरले आहेत. संपाच्या काळात तुटवड्यामुळे भाज्यांचे वाढ कमालीचे वाढले होते.