पीएम फंडसाठी ५० लाख दिल्याचा दावा करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक
उद्योग व्यापार मंडळातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला
फरुखाबाद : पंतप्रधान फंडसाठी ५० लाख रुपये दिल्याचा दावा करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी एफआयर दाखल केली आहे. आपण ५० लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीला दिल्याचा दावा हा व्यापारी करत होता. पण व्यापार मंडळातील इतर व्यापाऱ्यांनी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. सुनील असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
उद्योग व्यापार मंडळातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. व्यापार मंडळाने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे वाचा : आता फक्त २ तासांत होणार कोरोनाची चाचणी
सुनील हा फसवा व्यक्ती आहे. तो खोटे दावे करुन त्यावर आपले राजकारण करत आहे. काही कथित पत्रकारांच्या मदतीने सुनीलने ही जाहीरात शहरातील वर्तमान पत्रात छापली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबद्दल पोलीस अधिक चौकशी करत आहेत.