जळगाव:  जिल्ह्यातील चोपड्यात एका डॉक्टरवर केबिनमध्ये घुसून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शिरपूर रस्त्यावरील नर्मदा नगरमधील मालती हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पाटील हे केबिनमध्ये बसले होते. त्यावेळी गोविंद पाटील नावाच्या व्यक्तीने डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून आनंद पाटील यांना मारहाण करत शस्त्राने हल्ला केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कौटुंबिक कारणातून हल्ला झाल्याची चर्चा


हल्लेखोराचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय. या घटनेनंतर तिथले काही जण तात्काळ डॉ. आनंद पाटील यांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी या हल्लेखोराला बाहेर काढलं. हल्लेखोर हा डॉ. आनंद पाटील यांचा नातेवाईक असून कौटुंबिक कारणातून हा हल्ला केल्याचं बोललं जातंय. या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर


दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना अलिकडील काळात वाढताना दिसत आहेत. अत्यावस्थ अवस्थेत रूग्णाला रूग्णालयात दाखल केल्यावर त्या रूग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीने प्रयत्न करत असतात. मात्र, कधी कधी डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरतात. त्यामुळे रूग्णाचे नातेवाईक संतापतात आणि ते डॉक्टरांवर जीवघेना हल्ला करतात. हे हल्ले रोखण्यासाठी कायदाही करण्यात आला असून, त्यात गुन्हेगारांना शिक्षेची तरतूद आहे.