औरंगाबाद : आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकरावं ठाले-पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीपूर्वी नावाची चर्चा होऊ नये, म्हणून चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याची सूचना देण्यात आली होती. त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुरुवातीपासूनच अग्रक्रमी होते. अखेर त्यांच्या नावावर एकमताने पसंती देण्यात आली. १०,११,१२ जानेवारी रोजी हे संमेलन पार पडणार आहे.


उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे.


सुधारणावादी लेखक, विचारवंत अशी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख आहे. २०१३ सालचा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.