बापानेच सात महिन्यांच्या मुलीची केली हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

तालुक्यातील आंधळगाव येथे बापानेच आपल्या सात महिन्याच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून देल्याची घटना घडली आहे.
शिरूर : तालुक्यातील आंधळगाव येथे बापानेच आपल्या सात महिन्याच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून देल्याची घटना घडली आहे.
मुलगी हरवल्याची तक्रार
कौशल्या भुरा धुलकर असे या मुलीचे नाव आहे. स्वत: बापानेच बनाव करत पोलिसांमध्ये जाऊन मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या बापालाच अटक केली.
पत्नीवर संशय आणि हत्या
मुलगी पोटची नसल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी भुरा धुलकर ऊसतोड कामगार असून तो नेहमी आपल्या पत्नीवर संशय घ्यायचा.