हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरुन(Palghar Zilla Parishad election) राजकीय वातावरण चांगलं तापल आहे. 16 नोव्हेंबरला पालघर जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणुक होणार आहे. जिल्ह्यात  पंचायत समित्यांचा अनुभव पाहता सदस्यांची पळवा पळवी होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार हे सध्या अज्ञातस्थळी हलवले आहेत. 


पालघर जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी चढाओढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा परिणाम सर्वच निवणुकांमध्ये पहायला मिळत आहे.  पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. आता शिंदे गट बाहेर पडल्याने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सत्तेत बसण्याची शक्यता आहे. 
स्वतंत्र गट  करण्यासाठी शिंदे गटाने जबरदस्त तयारी सुरू करून दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. ठाकरे गटातील बहुसंख्य सदस्यांना पनवेल येथे एका अज्ञात स्थळी ठेवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 


पालघर जिल्हा परिषदचे पक्षीय बलाबल पाहता, भाजपचे -13,राष्ट्रवादी काँग्रेसचे -13, माकप -6, बहुजन विकास आघाडीचे 5, आणि शिवसेनेचे 20 असे एकूण 57 सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेत फूट पाडून मोठ्या संख्येत सदस्य शिंदे गटात गेले असल्याने आता भाजप आणि शिंदे गटचा सत्तेचा मार्ग सुकर झाल्याचं बोलले जात आहे.