औरंगाबादमध्ये सेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
शिवजयंती साजरी करण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे.
औरंगाबाद : शिवसेना आणि मराठा क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिवजयंती साजरी करण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे.
कशावरून झाला वाद
गेल्या १९ फेब्रुवारीला तारखेनुसार मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. मात्र, शिवसेना तारखेनुसार नाहीतर तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. आज औरंगाबाद शहरात याच कार्यक्रमाच्या कार्यालयचं उद्घाटन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार होतं.
कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
यावेळी काही मराठा क्रांती सेनेचे कार्यकर्ते तिथे आलेत आणि त्यांनी शिवजयंती एकच असली पाहिजे, असे सांगितले. यावरुनच इथे वाद पेटला आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हा वाद आत्ता शांत झाला असला तरी शिवजयंतीच्याआधी झालेला हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.