कळसुबाई शिखरावर तरुणांची हाणामारी; Video आला समोर
कळसुबाई शिखरावर छेडछाडीचे प्रकार होत असल्याची माहिती समोर आलीय
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई (Kalasubai) शिखरावर हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सप्तमीच्या निमित्ताने नवरात्र (navratri) उत्सवात कळसुबाई शिखरावरील (Kalasubai) कळसूबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या परिसरात दोन तरुणांच्या गटांमध्ये वैयक्तिक हमरी तुमरीवरून जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा बंदोबस्त नसल्याचे पाहायला मिळाले.
नवरात्रीनिमित्त कळसुबाई शिखरावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. शिखरावर अकोले, इगतपुरी तालुक्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दरम्यान, शिखरावर काही तरुणांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी कोणतीही पोलीस यंत्रणा उपस्थित नव्हती. मुलींचे छेड काढणे, लोकांना त्रास देणे असे प्रकार इथे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.