बीड : जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटात कोयता आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बीडमधील कामखेडा गावाजवळील पवार तांड्यावर घडली आहे. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पवार तांड्यावर भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पांडुरंग पवार(32), संतोष विठ्ठल पवार(36), सुनील बंडू पवार (22), निलाबाई अंकुश आढे (45), रमेश पवार (25) अशी जखमींची नावे आहेत. या गंभीर रुग्णावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी कुर्‍हाडी आणि कोयत्याने हल्ला केला. बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.