बीड :  शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते हे अटकेत आहेत. त्यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही तक्रार भाजपच्या तालुका अध्यक्षांनी केली. त्यानंतर गुन्हा दाखल केला गेला.  सदावर्ते यांच्याविरोधात बीडमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. (filed a case against gunaratna sadavarte in beed)


नक्की प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. "सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित केलं. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला. त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या", अशी तक्रार देण्यात आली होती.



...तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल


"याप्रकरणी सदावर्ते यांना तात्काळ अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वप्निल गलधर यांनी दिला आहे. डंके की चोट पर आम्ही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे", असं देखील गलधर यांनी नमूद केलं.