महाविकासआघाडी सरकारचा लांबलेला विस्तार आज
विस्तार लांबल्यामुळे या विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती.
मुंबई : सत्तेत आल्यानंतर अनेक दिवसांचा काळ लोटल्यानंतर अखेर महाराष्ट्रविकासआघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार आज म्हणजेच सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांना शपथ देतील.
दुपारी एक वाजल्यापासून विधानभवनाच्या समोर असणाऱ्या प्रांगणात हा विस्तार पार पडणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर महिनाभरापासून सात मंत्रीच राज्याचा कारभार पाहत आहेत. मुख्य म्हणजे महाविकास आघा़डीचा विस्तार लांबल्यामुळे या विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती.
विरोधकांची टीका आणि लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर निकाली निघण्याची वेळ समीप आली आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील. ज्यामध्ये १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ मंत्री या शपथविधी सोहळ्यात शपथ घेतील. यामध्ये १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसचेही १० मंत्री आज शपथ घेणार असून, यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत, त्यांना शरद पवारांनी स्वत: फोन करून माहिती दिली. एकरंदरच राज्याच्या राजकारणात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर आता आजचा दिवसही राजकारणाच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.
शंकरराव गडाख, अनिल परब, संजय राठोड, अब्दुल सत्तार, दादा भुसे, शंभुराजे देसाई बच्चू क़डू अशोक चव्हाण, अमित देशमुख, के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.
विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात कोणाच्या नावांचा समावेश असणार याविषयीच्या चर्चांनी जोर धरला असतानाच अजित पवारांच्या नावाकडे साऱ्यांच्या नजरा असतील. या मंत्रिमंडळ सोहळ्याच्या अनुशंगाने विशेष तयारीही करण्यात आली आहे. ज्यासाठी विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागी मुख्य स्टेज उभारण्यात आले आहेत. सोबतच भव्य मंडपही बांधण्यात आले आहेत. पाचशेहून अधिजण बसतील बसतील अशी व्यवस्था येथे करण्यात आल्याचं कळत आहे. या मंडपामध्ये दहाहून जास्त स्क्रीन उभारले जात आहेत. विधिमंडळ परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे.