दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी विविध भागात पूर आणि दरडी कोसळल्याच्या (Maharashtra Flood) घटना घडल्या. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांची संसारं उद्धवस्त झाली. व्यापाऱ्यांच्या दुकानातील वस्तूंची नासाडी झाली. या पुरामुळे संबंधित भागातील सर्वांनाच आर्थित तोटा सहन करावा लागलाय. दरम्यान या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काहीसा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) आज बैठक पार पडली. या बैठकीत 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मान्यता दिली. यानंतर आपत्ती पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettivar) यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणाला किती मदत मिळणार याबाबतची माहिती दिली.  (Financial assistance will be provided to shopkeepers and citizens affected by the floods areas of Maharashtra informed Cabinet Minister Vijay wadettiwar) 
 
दुकानदारांना आणि नागरिकांना किती मदत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पुरात नुकसान झालेल्या दुकानदारांना आणि नागरिकांना किती मदत मिळणार याची माहिती दिली. त्यानुसार दुकानदाराला प्रत्येकी 50 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर चहा टपरीचालकाला 15 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. 


घर गमावलेल्यांना काय?


या महापुरात ज्यांचं संपूर्ण घर कोसळलंय त्यांना 1 लाख 50 हजारांची मदत मिळणार आहे. तसेच पुरात ज्यांनी अर्ध घर गमावलंय त्यांना 50 हजार रुपये दण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मदत थेट बँकेत जमा होणार आहे. त्यामुळे ही रक्कम थेट पूरग्रस्तांना मिळून पारदर्शकता राहिल.