आर्थिक संकट : एसटीची स्वेच्छा निवृत्ती योजना
वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना ( ST`s Voluntary Retirement Scheme) लागू केली आहे.
मुंबई : वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून (ST Financial Crisis) बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना ( ST's Voluntary Retirement Scheme) लागू केली आहे. ३० जूनपर्यंत ५० वर्ष पूर्ण करणारे किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेल्या अधिकारी, कर्मचारी या योजनेस स्वेच्छा (Voluntary Retirement )पात्र राहणारेत. एसटीच्या २७ हजार पात्र एसटी कर्मचारी, (ST staff) अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत असल्याने, एसटी महामंडळाची महिन्याला १०० कोटींची बचत होणार असल्याचं एसटी महामंडळ प्रशासनानं सांगितले आहे.
खासगी प्रवासी वाहतुकीच्या चकाचक पर्यायांमुळे एसटीच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवलीय. त्यामुळे आधीच एसटीचे उत्पन्न बुडाले, त्यात कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल सात महिने एसटीची सेवा बंदच असल्याने एसटीची तिजोरी रिकामी झाली आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला असून, राज्य शासनाच्या विशेष आर्थिक पॅकेजवर एसटीचा डोलारा सध्या सुरु आहे.
एसटीची मालमत्ता, डेपो बँकेत तारण ठेऊन कर्ज घेणे, त्याशिवाय एसटीच्या मालवाहतुकीला प्राधान्य देऊन कमाई करण्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा प्रयत्न आहे. मात्र, एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिरिक्त झालेल्या ३० कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एसटीवर बोजा पडत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना आणली आहे.