नवी मुंबई : स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत.


पती आणि सासूची इच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश भोस्तेकर आणि त्यांची पत्नी शुभांगी भोस्तेकर यांना पाच आणि १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. मात्र, आपल्याला मुलगा व्हावा अशी प्रकाश आणि त्याच्या आईची इच्छा होती. त्यानंतर मुलगा होण्यासाठी सरोगेट आईच्या माध्यमातून २० सप्टेंबर २०१६ रोजी मुलाला जन्म देण्यात आला.


सरोगेट आईच्या माध्यमातून मुलगा


पत्नीला अंधारात ठेवून त्याने सरोगेट आई उपलब्ध करून घेतली आणि उपचार सुरू केले. २० सप्टेंबर, २०१६ रोजी सरोगेट आईच्या माध्यमातून मुलगा झाला.


पत्नीने केला गुन्हा दाखल


मुलगा होत नाही म्हणून पती प्रकाश आणि सासू लक्ष्मी भोस्तेकर यांच्याकडून नेहमी छळ होत असल्याची तक्रार शुभांगी यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात केली आहे. 


या तक्रारीनंतर, रुग्णालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबाबत फसवणुकीचा आणि दोन मुली असताना पत्नीला अंधारात ठेऊन मुलांच्या भवितव्याशी धोकादायक वर्तणूक केल्याप्रकरणी बाल न्याय अधिनियमातील कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


सरोगसीविषयी कायदा अजून अस्तित्वात नसल्याने अखिल भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी शिफारसही आयोगाने केली आहे. अशा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या या प्रकाराबद्दल शासनाने त्वरित विशेष तपासणी पथक (SIT) बनवण्याची शिफारस आयोगाने केली आहे. अखिल भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वावर कार्य केले जात आहे की नाही, याबाबत तपास करण्यासाठी एसआयटीची त्वरित स्थापना करण्याचे निर्देशही आयोगाने केले आहेत.