जातपंचायतीच्या 21 जणांवर गुन्हा दाखल
झी 24 तासने पहिल्यापासून हे प्रकरण लावून धरलं आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात राजावाडी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुलाला अटक झाल्यावर आता हे प्रकरण दडपणाऱ्या जातपंचायतीच्या 21 जणांवर गुन्हा दाखल झालाय. झी 24 तासने पहिल्यापासून हे प्रकरण लावून धरलं आहे.
झी 24 तासने बातमी प्रदर्षित केल्यावर पहिल्या दिवशी पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या प्रकरणात ठाकूर समाजाच्या जातपंचायतीने आरोपीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला होता.
आधी या मुलाला पीडित मुलीशी लग्न करण्याचा निवाडा जातपंचायतीने दिला. मात्र नंतर आपल्या निर्णयावरून घुमजाव करून या जातपंचायतीने पीडित कुटुंबालाच वाळीत टाकलं होतं... जातपंचायतीचा हा प्रकार झी 24 तासने उघड केला. अखेर या बातमीच्या दणक्यानंतर पोलिसांनी आज 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.