COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : नागपूरच्या कळमना परिसरातल्या धान्य गोदामाला आग लागली. ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. इमारतीचा काही भाग दुपारी साडे बाराच्या सुमारास कोसळला. 


आगीमध्ये सारं काही भस्मसात


अॅकॅलिप्स्टो अॅग्रो नावाच्या कंपनीच्या या गोदामात सुमारे 35 हजार क्विंटल तूर डाळ, 15 हजार क्विंटल तांदूळ, आणि 10 हजार क्विंटल गहू साठवण्यात आले होते. आगीमध्ये हे सारं काही भस्मसात झालंय. 


अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी


कामनानगर परिसरातल्या गोदामाच्या इमारतीला, पहाटे तीन ते साडेतीन दरम्यान आग लागली. आतापर्यत 25  टँकर पाणी टाकण्यात आले असून 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्यात. 


आगीचं कारण अद्याप अस्पष्ट


अग्निशमन दलाच्या प्रसंगावनधानामुळे जीवितहानी टळलीय. पण मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.