ठाणे - मुंब्रा - शिळफाटा रोडवरील गोदामांनी भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत सात गोदामं जळून राख झाली आहेत. या आगीत कोणतीची जीवितहानी झालेली नाही, मात्र गोदामाची राख झाल्याचं दिसत आहेत. या आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे गोदामांच पूर्ण नुकसान झालेलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खांदा कम्पाऊंडमधील गोदामांना लागलेल्या आगीत सातही गोदामांच नुकसान झालं आहे. या गोदामांमध्ये प्लास्टिक, केमिकल सारख्या गोष्टींचा साठा असल्यामुळे आग वाढतच होती. पण अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर 70 टक्के नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. 




अजून आग धगधगत आहे. पण या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोदाम किंवा लघु उद्योगांच्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्या सुरक्षांचा अभाव असल्याचं पाहायला मिळत तसंच काहीस इथे होतं का? अशा प्रश्न या घटनेनंतर उभा राहतो. गोदामातील ही आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण गोदामात असलेली अस्वच्छता, असुरक्षितता या गोष्टींमुळे आग लागण्यासारख्या दुर्घटना घडतात. हे पु्न्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 


सोमवारी देखील नागपाडा परिसरात एका चायना इमारतीला आग लागली होती. या इमारतीला लागलेल्या आगीत 5 जण जखमी झाले होते. यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा देखील सहभाग होता. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही.