लग्नात फटाक्यांमुळे आग; वऱ्हाड्यांच्या गाड्या जळून खाक
लग्नात फटाके फोडणं वऱ्हाडांना चांगलंच महगात पडलंय...
पुणे : लग्नसमारंभात सर्रास फटाके फोडले जातात. पण पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या चाले गावात लग्नात फटाके फोडणं वऱ्हाडांना चांगलंच महगात पडलं आहे. लग्नावेळी फोडलेल्या फटाक्यांमुळे परिसरात पार्क केलेल्या वऱ्हाड्यांच्या गाड्यांना आग लागली. या आगीत वऱ्हाड्यांच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
मुळशी गावातील सुभद्रा मंगल कार्यालयात ओहोळे आणि चंद्रस परिवाराचा लग्न सोहळा होता. लग्न लागल्यानंतर हॉलबाहेर फटाके फोडण्यात आली. फटाक्यांच्या ठिणगीमुळे जवळच पार्क केलेल्या वाहनाला लागली. ही आग वाढत गेली. एकामागोमाग एक अशा अनेक गाड्यांचा या आगीत कोळसा झाला. लग्नात हौसेने फटाके फोडले पण या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे वऱ्हाड्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे लग्नाला जाताना आपलं वाहन फटाके फोडतात त्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर ठेवावं असा धडा वऱ्हाड्यांना मिळालाय.