भिवंडीमध्ये 10 ते 12 गोदामाला भीषण आग
भिवंडीत श्री गणेश कंपाऊंड गोदाम संकुलातली आग 11 ते 12 तासांनंतरही विझलेली नाही. गुंडावली ग्रामपंचायत हद्दीत ऑइल साठविलेल्या गोदामाला रात्री बाराच्या सुमाराल भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग पसरली.
भिवंडी : भिवंडीत श्री गणेश कंपाऊंड गोदाम संकुलातली आग 11 ते 12 तासांनंतरही विझलेली नाही. गुंडावली ग्रामपंचायत हद्दीत ऑइल साठविलेल्या गोदामाला रात्री बाराच्या सुमाराल भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग पसरली.
आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
या आगीत 10 ते 12 गोदाम जाळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि ठाण्याच्या अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. हे इजिलिटी वेअरहाऊस आहे. या ठिकाणी गाड्यांचं ऑइल, बीएमडब्ल्यू गाड्यांचे टायर आणि इतर साहित्य तब्बल एक लाख स्क्वेअर फुटाच्या बारा गोदामांत साठविलं होतं.
24 तासाहून अधिक वेळ लागणार
गोदामात साठवलेले ऑइलचे डब्बे फुटल्याने आगीचे लोळ आकाशात पसरत होते. परिसरातल्या गोदामाच्या स्लॅबवर काही ऑइल टिन उडून आले होते. बाजुच्या इमारती मधील गोदामात साठविलेले कपड्याचे तागे सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेयत. आग विजवण्यासाठी 24 तासांहून अधिक वेळ लागणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली आहे.
बातमीचा व्हिडिओ