पालघर : पालघर जिल्हातील तारापूर MIDCमध्ये स्फोटामुळे लागलेली भीषण आग आटोक्यात आलीये. पण या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आलंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री उशिरा नोवा फेन केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली होती. या स्फोटांची तीव्रता इतकी भीषण होती की कंपनीपासून १५ किमी अंतरावर हादरे बसले. या स्फोटात १४ जण जखमी झालेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.


जखमींवर बोईसरच्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. रात्री ११.३० च्या दरम्यान हे स्फोट झाले. त्यानंतर कंपनीलगतच्या भारत रसायन, प्राची केमिकल, यूनिमेक्स या कंपन्यांनाही आगीचा विळखा पडला.