चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा शहरातील २२० केव्ही वीज उपकेंद्रात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे ट्रान्सफॉर्मनचे मोठे स्फोट झाले.


स्फोटांनी हा सगळा परिसर हादरून गेला. जवळपास ३५ गावांचा विजपूरवठा स्फोटानंतर खंडीत झालाय. वीज परत येण्यासाठी किमान २४ तास लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. कर्मचा-यांच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळलाय.